अझहर शेख, नाशिक: जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर भिडले. शिवीगाळ झाल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले. वाजे गट उद्धव सेना व शिंदे सेना आणि भाजपाचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगविले.
परिसरात गोंधळ व तणाव निर्माण झाल्याने मतदारांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरले. जे मतदार मतदान केंद्रात रांगेत उभे होते त्यांनी मतदान केंद्रातून पळापळ सुरू केली. एकीकडे पोलीस मतदारांना आवाहन करत होते, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनाही घटनास्थळावरून सांगत होते. आमदार देवयानी फरांदे यांना दूध बाजार महात्मा फुले मंडई येथे घेराव घालून कार्यकर्त्यांनी या भागात सत्ताधारी आमदारांनी फिर काहीच नाही, अशी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांना पळून लावलेले परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. यावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फरांदे व गीते समर्थक यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिस्थितीत तणावपूर्ण बनली.