नाशिक : पुढच्या वर्षी मार्च ते मे या कालावधीत पाच वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपणाऱ्या जिल्ह्णातील ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने येत्या १७ डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्णातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, मालेगाव या पाच तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींची मुदत मार्च ते मे महिन्यात संपुष्टात येत असून, राज्य निवडणूक आयोगाकडून तत्पूर्वीच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यादृष्टीने आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर केला असून, त्यात १० डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, ग्रामस्थांनी सदरच्या मतदार याद्यांची पाहणी करून त्यात आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करावी व या मतदार यादीविषयी काही तक्रारी असल्यास त्याविषयीच्या तक्रारी १४ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी १७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण काढण्यात येणार आहे.पुढचे वर्ष निवडणुकीचे असून, लोकसभा पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका होणारआहेत.साधारणत: मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राजकीय पक्षांसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगीत तालीम ठरणार आहेत. पोटनिवडणूकही होणारनिवडणुका होणाºया ग्रामपंचायतीत नाशिक- ५, त्र्यंबकेवर- १०, इगतपुरी- ३१, येवला व मालेगाव प्रत्येकी एक अशा ४७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सुमारे ४०० हून अधिक पोटनिवडणुकीसाठी देखील याचवेळी मतदान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णात अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या अनेक जागा वर्षानुवर्षे रिक्त असून, त्यामागे जात वैधता प्रमाणपत्राचा अडसर आहे.
लोकसभेपूर्वीच ग्रामपंचायतींचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:35 AM
नाशिक : पुढच्या वर्षी मार्च ते मे या कालावधीत पाच वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपणाऱ्या जिल्ह्णातील ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने येत्या १७ डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठळक मुद्देनिवडणूक : मतदार याद्यांचे काम युद्धपातळीवर