नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २३) जागतिक ग्रंथ दिनानिमित्त १५ ग्रंथपेट्या लंडन येथे रवाना झाल्याचे या उपक्रमाचे विनायक रानडे यांनी सांगितले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात मराठी साहित्याचे मंथन होत असलेल्या या उपक्रमात सध्या तब्बल दोन कोटी रुपयांची ग्रंथसंपदा असलेल्या १६६१ ग्रंथपेट्या आहेत. आता १५ ग्रंथपेट्या इल्फर्ड मित्रमंडळाच्या सागर डुगरेकर यांच्या पुढाकाराने लंडनमध्ये रवाना होत आहेत. यात मोठ्या वाचकांसाठी १३ ग्रंथपेट्या आणि बालसाहित्याच्या दोन ग्रंथपेट्यांचा समावेश आहे. दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल. ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके आहेत. देशात ग्रंथपेट्या : महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक. परदेशात ग्रंथपेट्या : दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लन्ड, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन, ओमान, बे एरिया सॅनफ्रान्सिस्को, मॉरिशस, सिंगापूर, लंडन.
नाशकातून लंडनला ग्रंथपेट्या रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:02 AM