नाशिक : महाराष्ट राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे नियोजित नाशिक ते मुंबई लॉँग मार्च प्रशासनाने परवानगी नाकारल्याने नाशिकमध्येच स्थगित करण्यात आला. प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिलेली नसतानाही पूर्व नियोजनानुसार राज्यभरातून गोल्फ क्लब मैदानावर मोर्चेकरी जमू लागल्याने प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधून रोजगार हमी सचिवांशी बुधवारी (दि. २७) बैठक घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर लाँग मार्च स्थगित करीत असल्याची मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी दिली.कंत्राटी कामगारांचे शासन सेवेत समायोजन, समान काम, समानवेतन, बाह्यस्रोत यंत्रणा रद्द करून शासन सेवेत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाºयांना शासनाच्या आस्थापनांवर सामावून घ्यावे आदी मागण्यासाठी कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांनी काढलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळात झालेल्या बैठकीनंतर तूर्तास स्थगित करण्यात आला. लाँग मार्चला परवानगी नसल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी व आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक घडवून आणली. यावेळी आंदोलकांनी आम्ही मुख्यमंत्र्यांशिवाय इतर कोणाला भेटणार नसल्याची भूमिका घेतली होती.जिल्हाधिकाºयांसोबत बैठकपोलीस प्रशासनाने लाँग मार्च न काढण्याबाबत सूचना केल्या. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. या बैठकीत मोर्चेकºयांना बुधवारी रोजगार हमी सचिवांशी बैठक घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकºयांनी अखेर आंदोलन स्थगित केल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी दिली.
कंत्राटी कामगारांचा लाँग मार्च स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:51 AM