लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्टÑातील सर्वांत मोठा बोगदा तयार होत आहे. लॉकडाऊनमध्ये विशेष परवानगीने आणि आता अनलॉकमध्येही या मार्गावरील दोन पूल आणि बोगद्याचे काम अविरत सुरू आहे.राज्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प असून, मुंबई आणि नागपूर मार्गाच्या समृद्ध विकासामुळे या मार्गावरील उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यांमधून हा सुपरफास्ट माहामार्ग जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये नाशिकमधील समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, लॉकडाऊनचा सुरुवातीचे काही दिवस वगळता सातत्याने कामकाज सुरू आहे. या महामार्गाचे १ ते १६ इतके टप्प असून, नाशिक जिल्ह्यातील बोगद्याचे काम असलेला हा १४वा टप्पा आहे. याशिवाय या टप्प्यात ४० किलोमीटर लांबीचा टप्पा इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे. सप्टेंबर २०२२मध्ये बोगदा काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.या मार्गावर दोन डोंगरांना जोडणारा पूल हा सर्वांत मोठा असणार आहे, तर दुसरा सर्वांत उंच पूलदेखील असणार आहे. समृद्धी महामार्गावर नाशिकमधून जाणाºया या महामार्गावर हे दोन्ही मोठे काम सुरू झाले आहे.कसारा घाट अवघ्या ७ मिनिटांत होणार पारया महामार्गाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातून दोन मोठे बोगदे तयार करून मार्ग तयार केले जात आहे. आत्तापर्यंत सुमारे २४ टक्के या बोगद्यांचे काम झाले आहे. डाव्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८ मीटर लांबीचा तर उजव्या बाजूचा बोगदा हा ७.७४ मीटर लांबीचा असणार आहे. या बोगद्यामुळे कसारा घाट हा सात मिनिटांत पार करता येणार आहे. शिवाय मुंबईला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे.
१) बोगद्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद््भवल्यास बोगद्यामध्ये ३०० मीटर अंतरावर २६ क्रॉस पॅसेज देण्यात आलेले आहे. या क्रॉस पॅसेजमधून दुसºया बाजूच्या बोगद्यात वाहने वळविली जाऊ शकतात.२) बोगद्यात एखाद्या वाहनात काही बिघाड झाल्यास त्यांना गाडी बाजूला लावण्यासाठी प्रत्येक७०० मीटरवर ले-बाय मार्ग करण्यात आला आहे.३) बोगद्याचे उंची ९.१२ मीटर, तर रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे.४) व्हेंटिलेशन फॅन देण्यात आला असून, नैसर्गिक हवा बोगद्यात राहण्यासाठी बोगद्याच्या वरून सात मीटरचा व्हर्टिकल शेफ्ट देण्यात आले आहे.५) अग्निशमन हायड्रंट यंत्रणा, उद्घोषणा व्यवस्था असणार आहे.