नाशिक : रस्त्यांच्या कडेला तसेच नदीकाठालगत बांधकामाचे निरुपयोगी साहित्य अर्थात डेबरेज टाकून देत शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्यांवर आता महापालिकेची करडी नजर राहणार असून, त्यासंबंधी लवकरच धडक मोहीम राबविण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी स्वत: इंद्रप्रस्थ पुलाजवळ डेबरेज टाकणारे वाहन पकडून दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणाही जागची हलली आणि संबंधितावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शहरात ठिकठिकाणी रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या डेबरेजविषयी चिंता व्यक्त करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना महापौरांना केल्या होत्या. याचबरोबर सदर डेबरेज उचलून नेण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचीही सूचना करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकांकडून निरुपयोगी बांधकाम साहित्य कोठेही रस्त्यालगत टाकून दिली जाते.
डेबरेज टाकणाऱ्यांवर नजर
By admin | Published: June 12, 2015 11:40 PM