नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तरुणाईमध्ये निवडणूक निकालाविषयी उत्सूकता दिसून येत असून सोशल मिडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे व दिंडोरीमधून भारती पवार आघाडीवर असल्यातरी अनेकजण अजूनही धीर-धरा, वाट-पहा असे संदेश वायरल करीत आहे. दुसरीकडे सोशल मिडियातून लक्ष ठेवून आहे. निकालांच्या प्रत्येक घडामोडीवर नाशिककरांचे लक्ष आहे. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि माजी खासदार तथा माजी उपमुख्यमंमत्री छगन भूजबळ यांचे पुतणे समीर भूजबळ यांच्यात चुरशीची लढत असून दिंडोरी मतदार संघात राष्ट्रावादीचे धनराज महाले व भाजपाच्या भारती पवार यांच्यात लढत असून दोन्ही मतदार संघात युतीचे उमेदवार अघाडीवर असून या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जुमलेबाजी सुरू केली आहे.
नाशिक,दिंडोरीच्या निकालासाठी नाशिकरांची सोशल मिडियावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:12 AM
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तरुणाईमध्ये निवडणूक निकालाविषयी उत्सूकता दिसून येत असून सोशल मिडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि माजी खासदार तथा माजी उपमुख्यमंमत्री छगन भूजबळ यांचे पुतणे समीर भूजबळ यांच्यात चुरशीची लढत असून दिंडोरी मतदार संघात राष्ट्रावादीचे धनराज महाले व भाजपाच्या भारती पवार यांच्यात लढत आहे.
ठळक मुद्देनाशिकरांना निकालाविषयी उत्सूकता नाशिकरांची सोशल मिडियावर नजरनाशिक दिंडोरीच्या निकालावर नजर