शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नवनिर्माण पहा आणि कौतुकाची फुले वाहा !

By admin | Published: January 17, 2017 12:09 AM

मनसेचे इलेक्शन टूरिझम : मराठी तारे-तारकांचे आज नाशिक दर्शन

नाशिक : ‘मला पहा आणि फुलं वाहा’ असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि. १७) नाशिकमध्ये मनसेकडून राबविल्या जाणाऱ्या इलेक्शन टूरिझमच्या माध्यमातून येणार आहे. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात मनसेने शहरात केलेले नवनिर्माण पाहण्यासाठी ठाणेकरांनंतर आता सुमारे चार डझन मराठी तारे - तारका मंगळवारी नाशकात येत आहेत. दिवसभर विविध प्रकल्प पाहून तारे-तारका मनसेवर कौतुकाची फुले उधळतील आणि पक्षाच्या प्रचाराचाही नारळ फुटेल. मनसेने सत्ताकाळात नाशिक फर्स्टमार्फत ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, नेहरू वनोद्यानात टाटा ट्रस्टच्या वतीने बॉटनिकल गार्डन, रिलायन्सच्या माध्यमातून गोदापार्क, शिर्के उद्योग समूहातर्फे अहल्यादेवी होळकर पुलावर वॉटर कर्टन व शंभर फुटी कारंजा, जीव्हीकेमार्फत इतिहास वस्तु संग्रहालय आणि एल अ‍ॅण्ड टीमार्फत उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण आदि प्रकल्प सीएसआर उपक्रमांतून साकारलेले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने या नवनिर्माणाच्या आधारे मतदार पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यामुळे इतरांना नाशिक दर्शन घडवित इलेक्शन टूरिझमही सुरू केले आहे. मागील आठवड्यात ठाण्यातील काही नागरिकांना नवनिर्माणाचे दर्शन घडविण्यात आले, तर दोन दिवसांपूर्वी ‘राज’पुत्र अमित ठाकरे हे मित्रांना घेऊन आले होते. आता सुमारे ५० हून अधिक मराठी तारे - तारकांना आणून मनसे मंगळवारी नाशिकची सैर घडविणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत अमित ठाकरे आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकरही उपस्थित राहणार आहेत. चित्रपट कलावंतांना नवनिर्माणाचे प्रकल्प दाखवून त्यांचे अभिप्राय नाशिककरांसमोर ऐकविण्याचे नियोजन आहे. सदर नवनिर्माण पाहून नियोजनानुसार मराठी तारे-तारका कौतुकाची फुले उधळतील आणि त्यानिमित्ताने मनसेचाही प्रचार साधला जाईल. (प्रतिनिधी)या कलावंतांची लागणार उपस्थितीमनसेचे नवनिर्माण पाहण्यासाठी अभिनेता व निर्माता महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, अलका कुबल, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय मोने, पुष्कर क्षोत्री, रवि जाधव, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, मेधा मांजरेकर, मुग्धा कर्णिक, मेधा दाढे, माधवी निमकर, जितेंद्र जोशी, अंकित विश्वासराव, आनंद इंगळे आदि कलावंत मंडळी नाशिक टूरवर येणार आहे.