ठळक मुद्देविविध प्रकारच्या जमीन मोजणीचे तालुक्यातील कामकाज उपअधिक्षक भूमि अभिलेख या कार्यालयाकडून
चांदवड : तालुक्यातील जमीन मोजणी कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मुलन समिती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फेनिवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवाजी दवंडे, सलीम सय्यद, आर.के.खांगळ , विजय फापाळे, जुबेद तांबट यांचा समावेश होता.उपअधिक्षक भूमि अभिलेख तथा तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे नागरीक हे रहदारीचे प्लॉट मोजणी, येणे केलेली जमीन मोजणे, शेतकरी पिकासाठी कसत असलेल्या शेत जमीन मोजणी आदि विविध प्रकारच्या जमीन मोजणीचे तालुक्यातील कामकाज उपअधिक्षक भूमि अभिलेख या कार्यालयाकडून केले जाते. मात्र, कामकाज सुरळीत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.