नाशिक : शहरात ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरी, घरफोडी, कारफोडीच्या घटना राजरोसपणे घडत असल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. अशाच प्रकारे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून चोरट्यांनी सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आडगावमध्ये राहणाऱ्या उज्ज्वला शहाजीराव झोमान (६३) या वृद्धेच्या घरातून १ लाख ७० हजार रु पयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड अज्ञात चोरट्यांनी हातोहात गायब केली. तसेच दुसºया घटनेत रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी स्नेहल मनोज देशपांडे (रा. खुटवडनगर) यांच्या घराची खिडकी उघडून त्यामधून हात टाकून ३ लाख २४ हजार रु पयांचे सोन्याचे दागिने व काही रोकड लंपास केली. त्याचप्रमाणे शालिमार येथील देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील एका युवतीच्या गळ्यातील एक तोळ्याची २५ हजार रु पयांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच चौथ्या घटनेत वाघ महाविद्यालयाजवळ उभ्या असलेल्या कारची (एमएच ०५, सीएच ३३५४) काच फोडून चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेला ७२ हजार रुपयांचा ऐवज सोमवारी (दि.२८) सकाळी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पळसे येथे घरफोडीपळसे येथील चौधरी इमारतीत बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. पळसे येथील चौधरी यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहणारे जुबेर अहमद अल्लाबक्ष पठाण यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, घराला कुलूप लावून बिटको रु ग्णालयात गेलो होतो. मंगळवारी सकाळी नातेवाइकांचा फोन आला की, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे.घरी आल्यावर पाहिले असता चोरट्याने दरवाजाचे कुलूप कापून घरातील सोन्याच्या दोन अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले, पॅन्डल, नेकलेस, पोत, चांदीचे दोन कडे, चांदीचा वेढा, अंगठी व ३१ हजार रोख असा एक लाख तीस हजारांचा ऐवज चोरून नेला. नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.सातपूर, सिडकोत घरफोड्यांचे सत्रशहरातील पळसे येथील जुबेर अहमद अल्लाबक्ष पठाण (३३) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे १ लाख ३० हजार रु पयांचे सोन्याचांदीचे दागिने, रोकड असा ऐवज लूटून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. सातपूरच्या स्वारबाबानगर परिसरातील सुभाष राजपथ सहाणी (६८) यांच्या दुकानाचा पत्रा तोडून चोरट्याने २६हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच निवृत्ती भाऊसाहेब सानप (४४, रा. तानाजी चौक, सिडको) यांच्या राहत्या घरात घरफोडी करून चोरट्याने ६५ हजारांची रोकड लंपास केली. तसेच गणेश चौक येथील हिरामण रामदास आहेर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ४३ हजार रु पयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लूटून पोबारा केला. सातपूर अंबड लिंकरोडवरील म्हाडा कॉलनीतील माया रमेश सुरसे यांच्या घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ४७ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. या तीनही घटनांचा तपास अंबड पोलीस तपास करीत आहेत.इंदिरानगरला पुन्हा सोनसाखळी चोरी४इंदिरानगर व म्हसरूळ पोलीस ठाण्याची हद्द मागील काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर आहे. सातत्याने या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाºया लुटीच्या घटनांमुळे महिलावर्ग कमालीचा धास्तावला आहे. पाथर्डी गावाच्या दिशेने पायी जाणाºया एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेली. या प्रकरणी ज्योती एम. धोंगडे (रा. हनुमाननगर, पाथर्डी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्योती धोंगडे रविवारी घराकडे पायी जात होत्या. यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे सव्वा तीन तोळे वजनाचे ६४ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध घटनांमध्ये ७ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:56 AM