सायखेडा : इंग्रजी पुस्तकांना पिवळ्या रंगाचे, तर मराठी पुस्तक व वहीला नारंगी रंगाचेच कव्हर लावावे तसेच पाल्यांचा गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करावा, इतरत्र दुकानातले गणवेश चालणार नाहीत, अशा भरमसाठ अटी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना प्रवेश घेताना घातल्या आहेत. साहित्य खरेदीसाठी सक्ती केल्याने पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये डोनेशन घेऊ नये, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचे काहींनी पालन केले आहे. परंतु दुसरीकडे काही इंग्रजी शाळांमध्ये साहित्य खरेदीची सक्ती करून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. पुस्तक, वह्या, गणवेश खरेदीसाठी काही इंग्रजी शाळांकडून दुकानांची यादी देऊन याच दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली आहे. यामुळे सर्वसामान्य पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. काही पालक कर्ज घेऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे म्हणून साहित्य खरेदी करीत आहे. अशी केली सक्ती शैक्षणिक साहित्य विद्यार्थी याअगोदर आर्थिक परिस्थितीनुसार खरेदी करीत होते. परंतु अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी भरमसाठ अटी घालून दिल्याने एवढे पैस आणायचे कुठून, असा प्रश्न पालकांना पडला आहे. याच दुकानातून वह्या, पुस्तके, गणवेश खरेदी करावे, तसेच दोन गणवेश घ्यावेत, त्यामुळे हजार रु पये दोन गणवेश खरेदीसाठी पालकांना मोजावे लागत आहेत. याशिवाय याव्यतिरिक्त बुधवार, शनिवारी स्पोर्ट ड्रेस, बूट घालावा लागतो. त्यामुळे तो वेगळा खरेदी करावा लागत आहे. याशिवाय दप्तर खरेदीसाठीही ठरावीक दुकानांमधून सक्ती केली जात आहे. याशिवाय ठरावीक रंगाचेच बुट घालावे लागतात. त्यामुळे दोन दोन बूट खरेदी करण्यासाठीही पालकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.साहित्य खरेदीची मुभा द्यावीगणवेश किंवा वह्या-पुस्तके पालकवर्ग परिस्थितीनुसार खरेदी करत असतात. परंतु काही इंग्रजी शाळांनी ठरावीक दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केली आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांची प्रवेश फी भरावी की साहित्य खरेदी करावे, असा प्रश्न पडला आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यामुळे इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या परिस्थितीनुसार साहित्य खरेदीची मुभा द्यावी, अशी मागणीही पालकवर्गाकडून केली जात आहे. सक्ती कशासाठी?गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा; परंतु काही इंग्रजी शाळा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ठरावीक दुकानातून खरेदीची सक्ती का करतात, असा प्रश्न पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्य पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण कसे द्यावे, असाही प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
इंग्रजी शाळांकडून पालकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:15 PM
सायखेडा : इंग्रजी पुस्तकांना पिवळ्या रंगाचे, तर मराठी पुस्तक व वहीला नारंगी रंगाचेच कव्हर लावावे तसेच पाल्यांचा गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करावा, इतरत्र दुकानातले गणवेश चालणार नाहीत, अशा भरमसाठ अटी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना प्रवेश घेताना घातल्या आहेत. साहित्य खरेदीसाठी सक्ती केल्याने पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देसाहित्य खरेदीसाठी केली जाते सक्ती : गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करण्याचे फर्मान