नाशिक : शहरात पादचारी तसेच दुचाकीने जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत लुटण्याचे प्रकार गत पंधरा दिवसांत घडले आहेत. विशेष म्हणजे लुटीच्या या घटनांमध्ये केवळ सराईत गुन्हेगारांचाच नव्हे तर उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचाही सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती तर पोलिसांसमोर या लुटमार करणाऱ्यांना शोधण्याचे आव्हान आहे.काही महिन्यांपूर्वी शालिमारसारख्या गजबजलेल्या चौकात लुटीच्या घटना घडल्या होत्या तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी प्रवाशांना तपोवनातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन लूट केल्याचे प्रकारदेखील समोर आले होते. तोतया पोलिसांकडून वृद्धांची होणारी फसवणूक या घटनांना गेल्या कित्येक वर्षांपासून आळा बसू शकलेला नाही. त्यामुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि विस्तीर्ण रस्त्यांमुळे सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांकडून लुटीचे प्रकार घडत आहेत. अशा मार्गांवर नाकाबंदी करणे गरजेचे झाले आहे. शहरात दोन दिवसात पुन्हा लुटीच्या दोन घटना घडल्या आहेत.
शहरात लूटसत्र
By admin | Published: December 17, 2015 12:40 AM