नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, दुचाकींची चोरी, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून, गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्याच्या किचनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरकरनगर येथे राहणारे प्रतीक सुशील चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भूखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंगल्यात पाठीमागील बाजूने किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.बंगल्यातील लाकडी कपाट तोडून त्यातील लहान तिजोरी फोडून दागिने भामट्याने लंपास केल्याचे चक्रनारायण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्याने वीस तोळे वजनाची सोन्याची सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ४५ हजारांच्या सोन्याच्या प्रत्येकी ४० ग्रॅमच्या नऊ बांगड्या, ४० हजारांचे कानातील खडे असलेल्या दोन रिंग, ३० हजारांच्या गळ्यातील सोन्याचे पॅँडल, १० हजारांच्या कानातील पाच ग्रॅमच्या रिंगा, एक लाखाचे गळ्यातील अॅमरॉल्ड पॅँडल, ३० हजारांचे गळ्यातील हिरेजडित पॅँडल, एक लाखाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ४५ हजारांचा तीन तोळ्याचा हार, ६० हजारांच्या चार तोळ्यांच्या बांगड्या, ५० हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडीसावरकरनगर, गंगापूररोड परिसर, नृसिंहनगर, आकाशवाणी टॉवर या भागात या जबरी घरफोडीच्या गुन्ह्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घर बंद करून जाणेदेखील धोक्याचे ठरूलागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. गंगापूर पोलीस ठाण्याकडून या भागात पोलीस गस्त थंडावली असून, मोकाट गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण चोरट्यांची मजल इतकी वाढली आहे की त्यांनी शारदाननगर येथील शिल्प बंगल्यातील तिजोरी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लुटून नेली. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील बंद राहणाºया घरांची सुरक्षितता अधिकच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. या गुन्ह्यात अद्याप एकाही संशयिताला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
लाखोंच्या हिरेजडित दागिन्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:37 AM