त्र्यंबकेश्वर : हरी-हर वेगळे नाहीत, एकच आहेत. कुठलेही स्वरूप असले तरी सर्वत्र देव एकच आहे, असे जयंत महाराज गोसावी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.येथे अखंड हरिनाम द्वादशाह सोहळ्यात प्रवचन करताना ते बोलत होते. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी त्र्यंबकबाबा भगत सिन्नर, निवृत्तिनाथ अभिषेक, पंडित महाराज कोल्हे, गुरुवर्य महंत रघुनाथ महाराज, देवबाप्पा फरशीवाले बाबा, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, श्री गणेशनाथ महाराज आदी उपस्थित होते. गोसावी महाराज म्हणाले, संत नरहरी महाराजांना जाणवले देव एकच असून, फक्त वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहे. त्यांनी संत नरहरी महाराज यांच्याविषयी अधिक माहिती दिली. हा सोहळा १२ दिवस चालणार असून, जगद्गुरु तुकोबारायांचे वेदवाणीचा १२००० वाचकांसह विराट जयघोष येथे सुरू आहे. दुसऱ्या सत्रात अनिल महाराज पाटील यांनी संत सेना महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली. दीपप्रज्वलनप्रसंगी गुरुवर्य जयवंत महाराज कराडकर, महंत सागरानंद सरस्वती, पंढरीनाथ महाराज, तर ग्रंथपूजनप्रसंगी प्रसाद महाराज अंमळनेरक, उमेश महाराज दशरथे आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे रविवारपासून गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सवास प्रारंभ झाला आहे. बारा दिवस चालणाºया या सोहळ्याची बुधवार, दि. ४ मार्च रोजी बारा ज्योतिर्लिंग गाथा पारायणाने सांगता होणार आहे.
सर्वत्र परमेश्वर एकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:24 PM
हरी-हर वेगळे नाहीत, एकच आहेत. कुठलेही स्वरूप असले तरी सर्वत्र देव एकच आहे, असे जयंत महाराज गोसावी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.
ठळक मुद्देजयंत गोसावी : त्र्यंबकेश्वरला अखंड हरिनाम सोहळा