मातोरी : मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने नित्यनेमाने अतिवृष्टीचा तडाखा लावल्याने दिवसभर कडाक्याचे ऊन व सायंकाळी जोरदार अतिवृष्टी यामुळे परिसरात शेतमालाचे तर मोठे नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. परिसरात टमाटा, भुईमूग, झेंडू या पिकांची मोठी लागवड असून, मागील महिन्यात जोरदार पावसात शेतकऱ्यांची रोपे करपून गेल्याने लागवडीसाठी शेतकºयांनी जिवाचे रान करून पाऊस उघडताच जेथून रोप मिळेल तेथून अव्वाच्या सवा भावात रोपे खरेदी करून लागवड केली. पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.हाताशी लागलेला टमाटा पिकला, मात्र पावसाने झोडपून काढले. त्याचबरोबर जोरदार झालेल्या अतिवृष्टीने माझी शेतजमीन मोठ्या प्रमाणात खचली व पिके जळून गेली. यामुळे मोठे आर्थिक झाले आहे.- रमेश साठे, शेतकरीगेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहरच केला आहे. शेतीत पाणी मावत नाही एवढा पाऊस झाला. पिकांची नासाडी झाली. याबाबत शासनाने पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी.- रायबा उगले, शेतकरी
मुंगसरे, मखमलाबाद भागात शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:02 AM