पेठ -पाऊस थांबत नसल्याने कापणीला आलेले व कापून ठेवलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून आदिवासी बळीराजा हवालदिल झाला आहे. आक्टोबर महिना संपत आला तरीही या वर्षी प्रथमच सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस झाल्याने खरीपाची पिके अतिशय जोमाने वाढली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न येईल या आशेवर असलेल्या शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकाऊन घेतला जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाताचे पिक ऐन कापणीला आले असतांना परतीच्या पावसाने भात भिजला असून असाच पाऊस सुरू असला तर भात कापणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. पेठ तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे खरीप पिकावर अवलंबून असतात. त्यात अशा प्रकारे नुकसान झाल्यास वर्षभराची कुटूंबाची गुजराण कशी करावी असा प्रश्न आदिवासी जनतेसमोर ऊभा ठाकला आहे. काही शेतकर्यांनी भाताची कापणी केली तर काहींचा भात अजून शेतातच असल्याने आलेले पिक कसे लपवावे या साठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 1:17 PM