नाशिक : वैद्यकीय उपचारासाठी पैशाची निकड असलेल्या एकास एक कोटी रुपयांचे ८ टक्के व्याजाने कर्ज देण्याचे आश्वासन देऊन त्यापोटी साडेतीन कोटी रुपयांची मिळकत स्वत:च्या नावे करून घेत प्रत्यक्षात केवळ ३० लाख रुपये कर्ज देऊन घेतलेले कर्ज सव्याज परत देण्यास तयार असताना ते न स्वीकारता फसवणूक केल्याप्रकरणी सात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल शंकरलाल जाजू (८२, रा. जाजू निकेतन, पंजाब कॉलनी, दत्तमंदिर स्टॉप पुणेरोड) यांना वैद्यकीय उपचारासाठी पैशांची निकड होती़ त्यासाठी त्यांनी संशयित अविनाश निरंजन शिंदे (रा. महात्मानगर) व त्यांचे सहकारी पथिक सुरेश भंडारी (रा. सप्तशृंगी कॉलनी, गंगापूररोड), योगेश सुभाष आहेर (रा. धात्रकफाटा), तुषार सुंदर ठक्कर (रा. कृष्णनगर), चंचल लक्ष्मण साबळे (रा. जगतापनगर) आणि किरण पांडुरंग दाते (रा. तळेगाव), वनिता शिंदे (रा. महात्मानगर) यांच्याशी संपर्क साधला़ या संशयिताना जाजू यांना एक कोटी रुपये तीन महिन्यांसाठी प्रतिमाह आठ टक्के व्याजाने देण्याचे आश्वासन दिले़; मात्र तत्पूर्वी सुरक्षितता म्हणून जाजू यांच्या मालकीचे सहा फ्लॅट, ३९ गुंठे जमीन अशी साडेतीन कोटी रुपयांच्या मिळकतीचे विक्री करारनामे करून घेतले़ संबंधित रक्कम तीन महिन्यांनी सव्याज परत केल्यानंतर संबंधित मिळकती पुन्हा देण्याचे आश्वासन दिले़.प्रत्यक्षात संशयितांनी एक कोटी रुपये न देता केवळ तीस लाख रुपये दिल्याचे जाजू यांचे म्हणणे आहे़
कर्जाच्या नावाखाली कोट्यवधींच्या मालमत्तेचा अपहार
By admin | Published: April 12, 2017 10:26 PM