मानोरी : येवला तालुक्यातील साताळी येथे शेतीच्या वस्तू साठविण्यासाठी केलेल्या शेडला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.साताळी येथील भिंगारे रोड चारी नंबर ३४ येथील शेतकरी अशोक सूर्यभान कोकाटे यांच्या घराशेजारी शेतीच्या वस्तू साठवणूक केलेल्या शेडमध्ये मंगळवारी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत एक तुषार संच सेट, एक ठिबक संच सेट, १० पोती गहू, शेतीची मशागतीचे इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. दुपारी १२ वाजता आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत मोटर सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने भडका घेत संपूर्ण शेडला भस्मसात करून टाकले होते. यावेळी येवला नगरपालिकेच्या अग्निशमन बंबलादेखील पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचा बंब आल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे शेती साहित्य व धान्य जळून खाक झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.फोटो : ३० मानोरी १साताळी येथे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत शेती साहित्याचे झालेले नुकसान.
साताळीत शॉर्टसर्किटने दीड लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:51 PM
मानोरी : येवला तालुक्यातील साताळी येथे शेतीच्या वस्तू साठविण्यासाठी केलेल्या शेडला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.
ठळक मुद्देआगीने भडका घेत संपूर्ण शेडला भस्मसात करून टाकले