शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद असून, यामुळे मालेगाव एसटी आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांना लालपरीचे दर्शन होत नसल्याने दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम होत आहे. रेडझोनमुळे एस.टी. सुरू होण्याची तशी शक्यता नाही.शाळा कॉलेजेस बंद आहेत; परंतु शेतकऱ्यांना बाजार समितीत अथवा किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार असणारी लालपरी लॉकडाउनच्या संकटात सापडली आहे. मालेगाव एसटी आगारात सुमारे ८० बसेस गेल्या दीड महिन्यांपासून जागेवरच अडकल्या आहेत.मालेगाव आगारातून रोज पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव अशा दूरवर प्रवाशांना घेऊन जाणाºया बसेस आजही आगारात उभ्या आहेत. मालेगाव आगारात ६० मेकॅनिक आहेत.आगाराशेजारीच निवासास असणारे वर्कशॉपमधील कर्मचारी रोज न चुकता आगारात येऊन बंद स्थितीत उभ्या असणाºया बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून रोज किमान १५ बसेस चालू स्थितीत ठेवत आहेत. रोज सुमारे ७ ते ८ लाख रुपये उत्पन्न देणारी बस आगारात स्थितप्रज्ञ होऊन उभ्या आहेत.४५० वाहक-चालक घरी दररोज एसटी आगारात आपल्याला सोपवलेल्या मार्गावर एस.टी. प्रवाशाना घेऊन जाणारे आज घरी बसून आहेत. लॉकडाउनमुळे ते कंटाळले आहेत.-------पूर्ण वेतनाची अपेक्षामालेगाव आगारात १७0 वाहक आणि १८५ चालक आहेत. त्यात काही तालुक्यात जाणारे तर काही लांब मार्गावर बसेस नेणारे वाहक-चालक आहेत. मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन वाहक-चालक आणि कर्मचारी यांना मिळाले होते, तर अधिकाऱ्यांना ५० टक्के वेतन मिळाले होते. एप्रिल महिन्याचे पूर्ण वेतन मिळण्याची अपेक्षा आहे.
मालेगाव एसटी आगाराचे तीन कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:49 PM