नाशिक : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक सिंघल यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाल्याचे नमूद करत त्यांचे अखंड हिंदू कार्य सर्वांनी मिळून पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र युवाशक्ती मंचचे अध्यक्ष डॉ. उमेश मराठे यांनी केले.विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार विभाग तसेच, युवाशक्ती मंच यांच्या वतीने शनिवारी (दि.२९) काठे गल्ली येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. उमेश मराठे यांनी, अशोक सिंघल हिंदू धर्माचे तेजोमय सूर्य होते, असे सांगत श्रद्धासुमने अर्पित केली. याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या धर्म प्रसार विभागाचे क्षेत्रीय प्रमुख रघुनाथराव कुलकर्णी यांनी अशोक सिंघल यांच्यासोबत व्यतित केलेल्या आपल्या सहवासाची माहिती देत एक सरसेनापती कसा असावा, याची अनेक उदाहरणे देत अशोक सिंघल यांच्या विविध स्मृतींना उजाळा दिला. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाल्याचे नमूद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी धर्म प्रसारक विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरविंदराव वर्तक, मनोज जोशी, निरंजन कुलकर्णी, डॉ. मुकेश थोरात, प्रकाश जोशी, नाना भांड, मकरंद परांजपे, रमेश मानकर, युवाशक्ती मंच नाशिकरोड प्रमुख प्रशांत भिरूड, चारुशीला शिंगणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)युवाशक्ती मंचतर्फे अशोक सिंघल यांना श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. उमेश मराठे. समवेत रघुनाथराव कुलकर्णी, अरविंदराव वर्तक, मनोज जोशी, निरंजन कुलकर्णी, डॉ. मुकेश थोरात, प्रकाश जोशी, नाना भांड, मकरंद परांजपे आदि.
सिंघल यांच्या निधनाने समाजाची हानी
By admin | Published: November 30, 2015 10:55 PM