सटाणा : वेळोवेळी ग्रामपंचायतने ठराव करूनही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील पती-पत्नीवर ग्रामपंचायत सदस्यत्व गमविण्याची वेळ आली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्र वारी (दि.११) दिला. या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जाधव दांपत्याने पदाचा गैरवापर करून दोन हजार ५३६ रु पये घरपट्टी कर भरणा केला नाही म्हणून जाधव पती-पत्नीचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार अनिल जगन्नथ जाधव यांनी मालेगावचे अपर जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन मुंजवाड ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर बाळू जाधव व लता शंकर जाधव यांना दि. १ मे २०१५ रोजी दोन हजार ५३६ रुपयांची घरपट्टीचे देयक देण्यात आले होते. परंतु दोघांनी पदाचा गैरवापर करून तब्बल नऊ महिने दहा दिवस उशिराने कराचा भरणा केल्याचे आढळून आल्याने अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ह) अन्वये जी व्यक्ती पंचायतीला पाणीपट्टी, घरपट्टी व अन्य कराची मागणी केली त्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत कर भरण्यास कसूर केल्याचे आढळून आल्याने जाधव दांपत्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.अपर जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अन्य ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.सभांमध्ये ठराव करूनही थकबाकीदारमुंजवाड ग्रामपंचायतच्या सन २०१२ च्या निवडणुकीत प्रभाग क्र मांक १ मधून शंकर बाळू जाधव व लता शंकर जाधव हे पती-पत्नी सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र सदस्य म्हणून निवडून आलेल्या जाधव दांपत्याच्या उपस्थितीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत वेळोवेळी झालेल्या सभांमध्ये ठराव करूनही दि. १५ मे २०१३ ते १ मे २०१५ पर्यंत जाधव दांपत्य थकबाकीदार राहिले.
घरपट्टी भरली नाही म्हणून गमावले सदस्यत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:36 AM