नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले अारी सून नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी बुधवारी (दि.७) पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे दुपारी ३ वाजता व्हडीओ़ कॉन्फरन्सिंगद्वारे काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून संपूर्ण राज्याची लॉटरी काढली जाणार असून नाशिक जिल्ह्यातील १३ हजार ३२७ अर्जांविषयीचे चित्र या लॉटरी प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतर्गत नाशिक शहरातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून, शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६, तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे १३ हजार ३२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी मिळणार याविषयी बुधवारी (दि.७ ) लॉटरी प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असून या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रतिक्षा यादीही जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
पॉईंटर
नोंदणीकृत शाळा -४५०
उपलब्ध जागा - ४५४४
प्राप्त अर्ज १३३२७
इन्फो-
आता लक्ष लॉटरीकडे
आरीटी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतीक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे.
इन्फो
अशी आहेत आवश्यक कागदपत्र
आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरील पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.