पिंपळगाव बसवंत:मुलांनी स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रत्येक जण ईश्वराशी जोडलेला असतो. त्यामुळे आपल्या आतील आवाज ओळखा. तो ओळखला तर तुम्ही यशस्वी व्यक्ती बनू शकता. आपल्या ध्येयावर प्रेम करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊ़न आयुष्यात वाटचाल करा. आपले टॅलेन्ट योग्य ठिकाणी गुंतवा. ते नसेल तर जीवन व्यर्थ आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम चांगला माणूस बना, असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले.मविप्र संचालित पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, प्राचार्य एस. एस. घुमरे, उल्हास पाटील, दत्तोपंत आथरे, पुंडलिक निरगुडे, गुलाब मोरे, नारायण महाले, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय निफाडे, आदीं उपस्थित होते.उदगीरकर म्हणाले की,व्यसनांपासून दूर राहिला तर तुम्ही कायम तंदुरु स्त राहाल, सोशल मिडीयाचे गंभीर व्यसन युवा पिढीला लागले आहे. या मिडियाचा विधायक कार्यासाठी वापर करु न आपली प्रगती साधा.नाशिकमध्ये प्रतिभेची कमी नाही. हिंदी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे नाशिकचे. त्यामुळे बालीवूडवर आपले राज्य हवे अशी अपेक्षाही उदगीरकर यांनी व्यक्त केली.पिंपळगावमधूनही कलाकार घडले पाहिजेत. सोलापूरचा आकाश ठोसर परशा बनू शकतो तर तुम्हीदेखील काही तरी बनू शकता. त्यासाठी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कोणावरही निर्भर राहू नका. दुस-याचे खच्चीकरण करणे सोपे असते. चेह-यावर, वागण्या, बोलण्यावर आत्मविश्वास दाखवा. आत्मविश्वासाने वावरला तर जग तुम्हाला स्वीकारेल.बालीवूडच नव्हे तर सर्वच क्षेत्रात महिलांची पिळवणूक होते. त्यामुळे घाबरु न न जाता आत्मविश्वासाने वाटचाल करा. पालकांच्या विश्वासाला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्टी करु नका. असेही त्यांनी सांगितले.प्राचार्य घुमरे यांनी प्रास्तविक केले. शोभा डहाळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. बी. बी. पेखळे आणि अविनाश कदम यांनी क्र ीडा अहवाल सादर केला. जितेंद्र साळी यांनी गुणवंताच्या यादीचे वाचन केले. ज्ञानोबा ढगे यांनी परिचय करु न दिला. अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी नारायण शिंदे, भारत जाधव, गाणेश लिंबोळे, छाया डुकरे, मधुरा वाघ, सारीखा गायकवाड, , आदी उपस्थित होतेचौकट....क्र ीडा प्रकार , संस्कृत सांस्कृतिक व वार्षिक स्पर्धात विशेष उल्लखिनय कार्य केलेल्या या विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला. यातसुलतान देशमुख,नागेश नागरे,सागर नागरे,सनी सोनवणे,शुभांगी ढोमस,राखी गिहलोद,ऋ षिकेश मारकर ,रोहन राहणे,मयूर गांगुर्डे,तोफिक शेख ,ऋ षिकेश आहिरे, शेखर गुप्ता,नितीन लभडे,सपना दवंगे यांचा समावेश होता.फोटो ओळी......पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक वितरण प्रसंगी चिन्मय उदगीरकर. व्यासपीठावर मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, एस. एस. घुमरे, उल्हास पाटील, दत्तोपंत आथरे, पुंडलिकराव निरगुडे, गुलाबराव मोरे, नारायण महाले, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय निफाडे, इंजिनियर दत्ता निफाडे आदी.(18पिंपळगाव चिन्मय)
सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन ध्येयावर प्रेम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 4:18 PM
पिंपळगाव बसवंत: मुलांनी स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रत्येक जण ईश्वराशी जोडलेला असतो. त्यामुळे आपल्या आतील आवाज ओळखा. तो ओळखला तर तुम्ही यशस्वी व्यक्ती बनू शकता. आपल्या ध्येयावर प्रेम करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊ़न आयुष्यात वाटचाल करा. आपले टॅलेन्ट योग्य ठिकाणी गुंतवा. ते नसेल तर जीवन व्यर्थ आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम चांगला माणूस बना, असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले.
ठळक मुद्दे चिन्मय उदगीरकर: पिंपळगाव बसवंतच्या वाघ महाविद्यालयात पारितोषिक वितरण