शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

हृदयद्रावक घटनेनंतरही चिमुकल्या प्रेमचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:54 AM

हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झालेला अपघात आणि त्याच्या पालकांनी फोडलेला हंबरडा बघून प्रत्येकाच्याच जिवाचा थरकाप उडाला.

नाशिक : हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झालेला अपघात आणि त्याच्या पालकांनी फोडलेला हंबरडा बघून प्रत्येकाच्याच जिवाचा थरकाप उडाला. या घटनेनंतर काही तासांत स्वत:ला सावरत वडील सचिन निफाडे आणि कुटुंबीयांनी मिळून प्रेमच्या डोळ्यांसह त्वचादान करण्याचा दाखविलेला धीरोदात्तपणा सामाजिक बांधिलकीतील आदर्शाचा परमोच्च बिंदू ठरावा असाच होता.नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकलवारीत सहभागी झालेल्या नाशिकरोड येथील प्रेम निफाडे या नऊ वर्षीय सायकलिस्टचा ट्रकच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचंड उत्साही, निरागस, मनमिळावू अशा या बालकाचा करुण अंत हा हृदय हेलावून टाकणाराच होता. या घटनेनंतर कोणीही कोलमडून पडेल परंतु, अशा स्थितीतही कुटुंबीयांनी आपल्यातील संवेदनशीलता जपत सामाजिक भानही दाखवून दिले. सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर तत्काळ निफाडे कुटुंबीय सिन्नरच्या सार्वजनिक रुग्णालयात जमले. या धक्क्यातून सावरत वडील सचिन आणि अन्य कुटुंबीयांनी प्रेमचे शाबूत असलेले सर्व अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने डोळे आणि त्वचेचे दान करण्यात आले; मात्र तांत्रिक विलंबामुळे किडनी, लिव्हर दान करणे शक्य झाले नाही.सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हया घटनेने अनेक प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. पंढरपूरची सायकलवारी ही संकल्पना अत्यंत चांगली असल्यानेच नाशिकच्या सायकलप्रेमींमध्ये ती झटकन रुजली होती. २०१२ साली केवळ ११ सायकलपटूंपासून प्रारंभ झालेल्या या सायकलवारीत वर्षागणिक वाढ होऊन ती संख्या यंदा ७०० पर्यंत पोहोचली होती; मात्र या घटनेमुळे या सायकलवारीच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केली जाणारी भीती रास्तच ठरली. तसेच या घटनेतून बोध घेत भविष्यात निदान बालकांना तरी अशा जीवघेण्या साहसयात्रांमध्ये सहभागी करून घेऊ नये, हेच अधोरेखित झाले.वर्षभरापासून पूर्वतयारी४मागील वर्षीच प्रेम हा वारीत सहभागासाठी वडिलांच्या मागे लागला होता. अखेरीस यंदा या वारीत सहभागी होण्यास परवानगी मिळाल्याने तो उत्साहात होता. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच वडिलांबरोबर सरावदेखील प्रेमने केला होता.तिसऱ्या सायकलपटूचा अंत४सायकलिस्ट संघटनेच्या पेलेटॉन स्पर्धेत नाशिकचे उद्योजक दिलीप बोरोवके यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता, तर संघटना ज्यांनी खºया अर्थाने नावारूपाला आणली, त्या संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष जसपालसिंग यांचादेखील ऐन तारुण्यात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रेमचा अपघाती मृत्यू हा तर सर्वाधिक धक्कादायक आणि हृदयद्रावक ठरला.

टॅग्स :CyclingसायकलिंगAccidentअपघात