सुरगाणा : तालुक्यातील गाळबारी याच गावातील तरुणी मालती वाघमारे (१९) तरुण विलास राऊत (२१) दोघेही याच गावातील राहणारे या दोघांचे एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम जडले होते. एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. घरच्यांनी मालतीचा विवाह करण्याचे ठरविले; मात्र मालतीचा साखरपुडा, विवाह हा घरच्यांनी दुसऱ्या युवकासोबत ठरविण्यात आला होता.त्या दोघांनी मिळून एका दोराने समोरासमोर विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोराने घट्ट एकमेकांना आवळून बांधून घेतले. दोघांच्या गळ्याभोवती ओढणीचा फास बांधून घेऊन गाळबारी येथील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीत दोघांनी स्वत:ला झोकून दिले; मात्र हातपाय तसेच गळ्याभोवती घट्ट बांधल्याने दोघांनाही मोकळे होता आले नाही. त्यामुळे दोघेही विहिरीत बुडून मयत झाले. घरचे मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने ते परगावी सैराटमधील आर्ची परशासारखे पळून गेले असतील, नातेवाइकाकडे असतील म्हणून शोधाशोध केली नाही.तिसºया दिवशी दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना एका गावातीलच व्यक्तीने पाहिले, त्यामुळे या घटनेचा उलगडा झाला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.मालती व विलास या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचे पक्के मनात ठरविले होते. मुलीचा विचार न घेताच दुसºया बरोबर लग्न ठरविले त्यामुळे मालतीच्या मनाविरूद्ध घरच्यांचा निर्णय झाल्याने आपण एकमेकांबरोबर लग्न करायचे अन्यथा गळफास घेऊन आत्महत्या करायची, अशा घेतलेल्या खोट्या शपथांची खारखी आठवण मनात ठेवून दोघांनी आत्महत्या करण्याचा ठाम निर्णय घेतला.
प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:36 AM
सुरगाणा : तालुक्यातील गाळबारी याच गावातील तरुणी मालती वाघमारे (१९) तरुण विलास राऊत (२१) दोघेही याच गावातील राहणारे या दोघांचे एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम जडले होते. एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. घरच्यांनी मालतीचा विवाह करण्याचे ठरविले; मात्र मालतीचा साखरपुडा, विवाह हा घरच्यांनी दुसऱ्या युवकासोबत ठरविण्यात आला होता.
ठळक मुद्देविहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोराने घट्ट एकमेकांना आवळून बांधून घेतलेमालतीच्या मनाविरूद्ध घरच्यांचा निर्णय