पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीपंप नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी आहे, त्यांना शेतपिकांना पाणी देणे विजेअभावी शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांतून असंतोष प्रकट होत आहे.वीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पिंपळगाव वाखारी परिसरात कमी दाबाने विद्युतपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:24 AM
पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देवीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा