नाशिक : शहरासह जिल्हा पुन्हा गारठला असून, किमान तपमानात सातत्याने घसरत होत आहे. रविवारी (दि.७) पारा पुन्हा ८ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली.रविवार असूनही पहाटे जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटका मारणाºयांची गर्दी ओसरली होती. मागील बुधवारपर्यंत शहराचे किमान तपमान १० अंशांच्या पुढे सरकलेले होते. यामुळे बोचºया थंडीपासून नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला होता; मात्र गुरुवारपासून पुन्हा तपमान घसरू लागल्याने थंडीच्या तीव्रतेतही वाढ होऊ लागल्याने नाशिककरांकडून शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात झाली. १०.६ अंशांपर्यंत वर सरकलेला पारा थेट ८ अंशांपर्यंत खाली आला आहे. नाशिकमधील निफाड तालुका सर्वाधिक गारठला असून, तपमान ८ अंशांपेक्षाही खाली घसरले आहे.संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. यामुळे नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती. मात्र किमान तपमानाचा पारा या आठवड्यात दोनवेळा पुन्हा वर सरकल्याने थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिकांकडून व्यक्त होत होती, परंतु शनिवारपासून तपमान कमालीचे घसरू लागले. रविवारी ८ अंशांवर पारा आल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली. एकूणच वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर हैराण झाले आहेत. दिवसाही नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यात नाशिकमध्ये सर्वात नीचांकी तपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:55 AM
नाशिक : शहरासह जिल्हा पुन्हा गारठला असून, किमान तपमानात सातत्याने घसरत होत आहे. रविवारी (दि.७) पारा पुन्हा ८ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली.
ठळक मुद्देपारा घसरला : किमान तपमान ८ अंशांवर जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटका मारणाºयांची गर्दी ओसरलीउबदार कपड्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र