शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राज्यात नीचांकी तपमान नाशिकमध्ये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:04 AM

नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मागील गुरुवारी तपमानाचा पारा थेट ९.२ अंशांवर घसरला होता, मात्र रविवारी (दि.२४) पुन्हा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतलहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. काश्मीर खोºयात ...

ठळक मुद्देराज्यात नीचांकी तपमान नाशिकमध्ये !पारा ९.५ अंशांवर : नाशिककरांना भरली हुडहुडी

नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मागील गुरुवारी तपमानाचा पारा थेट ९.२ अंशांवर घसरला होता, मात्र रविवारी (दि.२४) पुन्हा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतलहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. काश्मीर खोºयात प्रचंड प्रमाणात थंडीची लाट पसरली असून, श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेल्यामुळे उत्तर भारतही थंडीच्या कडाक्याने प्रभावित झाला आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांसह महाराष्टÑातील काही शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. पारा पुन्हा दहा अंशांच्या खाली गेल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी सकाळी ९.५ इतके तपमान शहरातील पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले. एकूणच रविवारी नाशिकचे किमान तपमान राज्यात सर्वच प्रमुख शहरांपेक्षा कमी असल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली. दहा अंशांच्या खाली शहराचे तपमान येण्याची या पाच दिवसांत दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर महिन्यात नीचांकी १०.२ इतके तपमान नोंदविले गेले होते; मात्र डिसेंबरमध्ये पारा यापेक्षाही अधिक खाली घसरला आहे.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेक ोट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. आठवड्याचे किमान तपमान असे...

१७ डिसेंबर - १२.६१८ डिसेंबर - १२.७१९ डिसेंबर - १०.०२० डिसेंबर - १३.६

२१ डिसेंबर - ९.२२२ डिसेेंबर -११.२२३ डिसेंबर -१०.५२४ डिसेंबर -९.५

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तपमाननागपूर ९.८, जळगाव १०.२, अकोला १०.४, पुणे १०.६, सातारा ११.४, सोलापूर १३, सांगली १३.७, महाबळेश्वर १३.३, कोल्हापूर १५.९