नाशिक : चांदवडचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खैरे यांच्या अकस्मित निधनाने एक सच्चा व कट्टर शिवसैनिक हरपल्याची भावना जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली शंकर खैरे यांच्या निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या वतीने गटनेते प्रवीण जाधव,भास्कर गावित,भावना भंडारे यांनी, तर कॉँग्रेसच्या वतीने प्रा. अनिल पाटील, राष्ट्रवादीच्या वतीने अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, गोरख बोडके, प्रवीण गायकवाड, शैलेश सूर्यवंशी व भाजपाच्या वतीने मनीषा बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अनिल पाटील यांनी नानांच्या जाण्याने एक अभ्यासू सदस्य हरपल्याची भावना व्यक्त केली, तर शिवसेनेच्या वतीने सर्वांनीच एक सच्चा व निष्ठावान शिवसैनिक व मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी आपले सासरे केरू नाना चुंबळे व सेनेचे ज्येष्ठ सदस्य शंकर नाना खैरे यांची चांगली मैत्री होती. नानांच्या जाण्याने आपल्याला तेव्हा शंकर खैरे यांनी आधार दिला होता. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनीही आपल्यासोबत एक दशकाहून अधिक काळ सहकार व राजकारणात शंकर नाना खैरेंसोबत असल्याचे सांगितले. तर प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले की, नानांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला शेवटपर्यंत मदत केली. त्यांच्यासारखा अभ्यास सदस्य आपण पाहिला नाही. यावेळी शोकसभेत सभापती उषा बच्छाव, शोभा डोखळे, केदा अहेर, किरण थोरे, सदस्य चंद्रकांत वाघ,नितीन पवार,अर्जुन बर्डे, अर्जुन मेंगाळ,संगीता राजेंद्र ढगे, सुजाता सुनील वाजे, राजेश नवाळे, अलका सांळुखे, शीतल कडाळे, अलका जाधव, साईनाथ मोरे, बंडू गांगुर्डे, चांदवड पंचायत समिती सभापती अनिता सुखदेव जाधव आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
निष्ठावान शिवसैनिक हरपला शंकर खैरे शोकसभेत सर्वपक्षीय श्रद्धांजली
By admin | Published: December 13, 2014 1:56 AM