नाशिक : जुने नाशिक परिसर हा गावठाणचा भाग असून या परिसरात अनेक लहान-मोठे वाडे आहेत. बागवानपुरा-कथडा अमरधाम रस्त्यावरील भाई गल्लीमधील दुमजली कांबळे वाडा संततधार पावसाने पुर्णत: भीजला आणि रविवारी (दि.७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाड्याची एक बाजू कोसळली. सकाळपासून वाडा थरारत असल्याने रहिवाशी सतर्क झाले होते; मात्र त्यांनी वाड्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले नव्हते. अग्निशमन दलाचे जवान वाड्याची पुर्व पाहणी करण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व कुटुंबांना बाहेर हलविले आणि क्षणार्धात वाड्याची एक बाजू वेगाने कोसळली.जुन्या नाशकातील संभाजी चौकात पंधरवड्यापुर्वी वाडा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काजीपु-यातील धोकादायक झालेल्या एका बंद वाड्याची भींत मनपा पुर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी उतरवून घेतली. दरम्यान, रविवारी भोई गल्लीमधील दुमजली भव्य वाड्याची कमकुवत झालेली एक बाजू संपुर्णत: कोसळली. भोई गल्लीचा परिसर दाट लोकवस्तीचा असून या वाड्याजवळच सुमंत नाईक उर्दू शाळा असून येथून नागरिकांची तसेच मुलांची सतत वर्दळ सुरू असते. रविवारची सुटी असल्यामुळे शाळा दुपारच्या सुमारास बंद होती. तसेच संततधार सुरू असल्याने वर्दळही कमीच होती. साडेचार वाजेच्या सुमारास अग्निशामक मुख्यालयाला ‘कॉल’ आला. लिडिंग फायरमन श्याम राऊत, नाना गांगुर्डे यांच्यासह पुर्व बांधकाम विभागाच्या कर्मचा-यांनी वाड्यातील विक्रांत कांबळे यांच्यासह अन्य तीन कुटुंबातील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि वाड्याची एक बाजू धपकन कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्याची पाहणी करत संभाव्य धोका ओळखून तत्काळ रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने जीवीतहानी टळली अन्यथा अनर्थ झाला असता असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
सुदैवाने अनर्थ टळला : जुन्या नाशकातील कांबळे वाडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:33 PM
सकाळपासून वाडा थरारत असल्याने रहिवाशी सतर्क झाले होते; मात्र त्यांनी वाड्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले नव्हते. अग्निशमन दलाचे जवान वाड्याची पुर्व पाहणी करण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व कुटुंबांना बाहेर हलविले आणि क्षणार्धात वाड्याची एक बाजू वेगाने कोसळली.
ठळक मुद्देवाड्याची एक बाजू धपकन कोसळली. सकाळपासून वाडा थरारत होत