नाशिक: - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २०२०-२१ शैक्षणिक वर्षात एम.फिल. इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाकडून ‘एम.फिल. इन सायकॅट्रीक सोशल वर्क’, हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पुणे येथील महाराष्ट्र मेंटल हेल्थ इन्स्टिट्युट, बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल कॅम्पस येथे होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ सोशल आर्ट या पदव्युत्तर पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेशित करण्यात येईल. याबाबत विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.