सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत मशीनमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि़११) दुपारी घडली़ हरिहर बरमन (२२) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ मुंगी इंजिनिअरिंग कंपनीत हरिहर बरमन याने आॅपरेटरला पूर्वसूचना न देता मशीन स्वच्छ करण्यास सुरुवात केली़ या प्रकाराची माहिती नसलेल्या आॅपरेटरने मशीन सुरू केल्याने हरिहरच्या डोक्यास गंभीर जखम झाली़ त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:31 AM