सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या यंत्रांची अनुसूचित जनजाती समितीकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.
महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीतील सदस्य आमदार अनिल पाटील, आमदार राजेश पाडवी, आमदार रमेश पाटील यांनी मुंढेगाव येथे भेट देऊन कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानावर वाटप करण्यात आलेल्या भात लावणी यंत्र, काढणी यंत्र (रिपर), ट्रॅक्टर, रोटाव्हेटरची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली,
याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक सोनावणे यांनी आमदारांना कृषी औजारांसाठी देण्यात येणारे अनुदान याविषयी माहिती दिली. सभापती आणि उपस्थित शेतकऱ्यांनी अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी विनंती समितीला केली.
यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, सभापती सोमनाथ जोशी, गटविकास अधिकारी डॉ. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, अनिल मुजगुडे, रामा दिघे, चंद्रशेखर अकोले, किशोर भरते, संजीव चव्हाण, संजय पाटील, कृषी सहायक प्रियांका पांडुळे, जयश्री गांगुर्डे, वंदना शिगाडे, मोहिनी चावरा, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे, आदी उपस्थित होते.
(२१ टाकेद)
कृषियंत्रांची पाहणी करताना अनिल पाटील, राजेश पाडवी, रमेश पाटील. सोमनाथ जोशी व कृषी अधिकारी.
210921\21nsk_23_21092021_13.jpg
कृषीयंत्रांची पहाणी करतांना अनिल पाटील, राजेश पाडवी, रमेश पाटील. सोमनाथ जोशी व कृषी अधिकारी.