सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव व कुंडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.सिन्नर येथे मुसळगाव व कुंदेवाडी परिसरातून विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात शिकण्यासाठी दररोजची ये-जा करतात. या मार्गावर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या पाहता बसची संख्या अपुºया पडत असुन, ज्या बसेस चालु आहेत त्या इतर ठिकाणांहुन भरगच्च भरून येत असल्याने मुसळगाव व कुंदेवाडी भागातील विद्यार्थी व प्रवाशांना बसेसमधे जागे अभावी महाविद्यालयात येता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी विद्यालयात जाण्यास उशीर होतो. दररोज मुसळगाव ते सिन्नर या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची संख्या ३०० ते ४०० या दरम्यान आहे. त्यामानाने बसची संख्या कमी आहे. सकाळच्या सत्रात येणारी बस ही सकाळी ६.४५ ला येते मात्र विद्यार्थी १५० ते २०० असतात आणि बस एकच यामुळे विद्यार्थी, प्रवासी महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बºयाच विध्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नाही. तसेच बसेस अवेळी असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे, तालुका उपाध्यक्ष शरद घुगे, संतोष लोंढे, मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्नील आव्हाड, मनविसे जिल्हा सरचिटणीस सचिन भगत, मनविसे शहर अध्यक्ष सागर बेनके, भिवाजी शिंदे, श्रीकांत पवार, गणेश आव्हाड, दत्ता वरंदळ, हितेश जाधव, सोनू परमार, राहुल बोºहाडे, नीलेश भोकनळ, रतन शिरसाठ आधी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
जादा बसेससाठी मनसे कडून आगार प्रमुखांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 5:51 PM