घोटी : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्टेच्या समजल्या जाणा-या घोटीच्या उपसरपंचपदी मदन अर्जुन रु पवते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे संपूर्ण घोटी शहरातून स्वागत करण्यात आले. उपसरपंच आशाबाई जाधव यांनी आवर्तन पद्धतिने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये बैठक होऊन एकमताने मदन अर्जुन रु पवते यांचे नाव निश्चित करण्यात आले . आज सरपंच कोंड्याबाई बोटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपालिका सदस्यांची बैठक झाली .याबैठकीत उपसरपंच पदासाठी मदन रु पवते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. या बैठकीस सरपंच कोंड्याबाई बोटे ग्रामपालिका सदस्य रामदास शेलार , संतोष दगडे, समाधान जाधव, बाळासाहेब झोले , प्रा.मनोहर घोडे, धोंडीराम कौले , कैलास लोटे , मीना झोले, मीराबाई आंबेकर,मीराबाई काळे,मावळते उपसरपंच आशाबाई जाधव ,लताबाई जाधव, कु कोमल गोणके, मंगल आरोटे , इंदुमती अस्वले, ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे आदी उपस्थित होते. या निवडीप्रसंगी मधुकर रु पवते,धनंजय रु पवते,लालू रु पवते,आहिरे गुरु जी,उत्तम रु पवते,मिलिंद जगताप,नितीन नेटावटे यांच्यासह प्रबुद्ध मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घोटीच्या उपसरपंचपदी मदन रूपवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:09 PM