शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नाशिकमध्ये भाजपकडून ‘माधव’ पॅटर्नची रणनीती, बहुजन समाज महायुतीबरोबर असल्याचे दाखवण्यासाठी प्रयत्न

By संजय पाठक | Published: April 02, 2024 12:04 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

- संजय पाठकनाशिक - लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तथापि, गेल्या काही वर्षातील राजकारणाचा आढावा विशेषतः चळवळी लक्षात घेऊन भाजपने पुन्हा एकदा माधव (माळी-धनगर-वंजारी) या नीतीचा अवलंब सुरू केल्याची चर्चा होत आहे. ओबीसी समाजाला आकृष्ट करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 

नाशिकची जागा शिंदे सेनेलाच मिळेल, अशी अटकळ होती. मात्र, हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ही जागा हवी म्हणून भाजपने आग्रह धरला. त्यातून शिंदे सेना फार प्रभावित झाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने शिंदे सेनेची झोप उडवली. आधी ठाण्याला मग मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्यासमोर त्यांना शक्तिप्रदर्शन करावे लागले. 

छगन भुजबळच कशामुळे? - छगन भुजबळ आक्रमक नेते असून, ते पुन्हा दिल्लीत जाऊ शकतात.-त्याचा अन्य राज्यातही कमी अधिक प्रमाणात लाभ होऊ शकतो, अशी एक शक्यता आहे.- दुसरीकडे सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या राजकारणामुळे येवला मतदारसंघ तुलनेत तितकासा सोपा नाही, असेही मानले जाते.

पुन्हा गोडसे की भुजबळ ?छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांचा तसा खासदार हेमंत गोडसे यांनी सलग पराभव करून दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम नोंदवला. मात्र, भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. विशेषत: भुजबळ यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहा महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे महायुतीची बैठक झाली त्यावेळी आपल्याला लोकसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा झाल्याचे सांगण्यात आले, असा दावा केला.

प्रत्येक जागेचे स्वतंत्र समीकरण महायुतीला राज्यात ४५ प्लस आकडा पार करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जागेचे स्वतंत्र समीकरण मांडले जात आहे. पुन्हा एकदा भाजपकडून ‘माधव’ नीतीचा खेळ खेळला जात असल्याचीचर्चा आहे.बहुजन समाजाचा पक्ष ठसवण्यासाठी भाजपने यापूर्वी अशाच प्रकारे गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, अण्णा डांगे  यांच्यासारख्या नेत्यांना पुढे आणले. आताही पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना पुढे आणले आहेच, त्यात माळी समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून भुजबळ यांचा चेहरा पुढे केला जात असल्याची चर्चा आहे. सध्या राज्यातील आरक्षणांबाबतचे वाद बघता सर्व समाजच महायुतीबरोबर आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही भुजबळ यांना पुढे केले जाऊ शकते, असे सांगितले जाते. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nashik-pcनाशिकMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४