शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

माधवराव गायकवाड यांचे जात, वर्गविहीन समाजाचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:32 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे जात व वर्गविहीन समाजाचे स्वप्न होते़ गायकवाड यांच्या प्रेरणादायी विचार व स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन आयटक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता निकम यांनी केले़

ठळक मुद्देआदरांजली सभा : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याची खंत

नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे जात व वर्गविहीन समाजाचे स्वप्न होते़ गायकवाड यांच्या प्रेरणादायी विचार व स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन आयटक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता निकम यांनी केले़ भाकपा, आयटक व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने द्वारका येथील वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते़ यावेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न करणाऱ्या शासनाच्या मान्यवरांनी शेलक्या शब्दात निषेध केला़कम्युनिस्ट नेते राजू देसले यांनी आमदार गायकवाड यांनी स्वातंत्र्यासाठी भोगलेला तुरुंगवास, संयुक्त महाराष्ट्रासाठीचे योगदान, किसान सभेची उभारणी, भूमिहीन संघर्षमय वाटचाल सांगितली़ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार, मनमाड नगराध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधित केलेल्या कार्याबाबत माहिती दिली़यावेळी ज्योती नटराजन, शिवाजी शिंदे, करुणासागर पगारे, डॉ़संंजय जाधव, नामदेव बोराडे, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गायकवाड यांना अभिवादन करून आठवणी जागविल्या़ यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, तसेच पुरोगामी पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़शासनाचा निषेधज्येष्ठ नेते श्रीधर व्यवहारे यांनी स्वातंत्र्यसैनिक गायकवाड यांनी नाशिक जिल्ह्याला परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र बनविल्याचे सांगितले़ राम गायखे, मनीष बस्ते यांनी गायकवाड यांचे कार्य व आठवणींना उजाळा दिला़, तर माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी शासनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले नसले तरी मनमाडकरांनी शहर बंद ठेवून दिलेली आदरांजली हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे सांगत शासनाचा निषेध केला़

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया