शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

नाशिकमध्येही भाजपाला 'महाविकास' पडली महागात; शिवसेनेनं जागा राखली, राष्ट्रवादीनं 'कमावली'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:53 AM

नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले.

ठळक मुद्देभाजपाला राष्ट्रवादीकडून पराभवाचा धक्कादोन्ही जागांवर महाविकास आघाडीची बाजी

नाशिक-नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले. नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा होता. मात्र, राज्यात सत्तांतर होताच नाशिकमधील राजकीय हवाही बदलू लागल्याचं चित्र असून महाजन यांच्यासाठीही हा धक्का मानला जातोय. 

नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार ४,९१३ मते मिळाली तर पराभूत भाजपाच्या विशाखा शिरसाठ यांना १,५२५ मते मिळाली. यामुळे पवार यांचा ३,३८८ मतांनी दणदणीत विजय झाला.

सिडको विभागात प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे मधुकर जाधव हे देखील २,८१२ मतांच्या दणदणीत आघाडीने विजयी झाले आहेत. या जाधव यांना ५,८६५ मते मिळाली तर मनसेचे दिलीप दातीर यांना ३,०५३ मते मिळाली आहेत.

नाशिकरोड विभागातून भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर सिडको मधून देखील शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नाशिकरोडच्या सरोज आहिरे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणल्याने महापालिकेत भाजपाची एक जागा घटली आहे तर दुसरीकडे मधुकर जाधव निवडून आल्याने शिवसेनेने जागा राखली आहे. दिलीप दातीर विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरसेवकपदाची निवडणूक हरल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv SenaशिवसेनाGirish Mahajanगिरीश महाजन