शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM

सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’

सिडको :विद्या विनयन शोभते’ असे वाक्य शाळेच्या भिंतीवर रेखाटलेल्या महापालिकेच्या गणेश चौकातील हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत प्रवेश करतानाच मद्याच्या फुटलेल्या बाटल्यांचा कच दिसतो. यावरून या शाळेची सुरक्षितता किती रामभरोसे आहे याचे चित्र दर सुटीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बघावयास मिळते. अशी परिस्थिती असतानाही या शाळेकडे अद्यापही महापालिकेच्या कारभाऱ्यांनी याचे गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.सिडकोतील गणेश चौकात मनपा हायस्कूल आहे. या शाळेत सकाळी व दुपार असे वर्ग भरतात, परंतु या शाळेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शाळेच्या संपूर्ण आवारात कचरा साचलेला असून, गाजरगवत वाढलेले आहे. सकाळी अंगवाडीच्या तीन तुकड्या भरतात व दुपारी पाचवी ते दहावीच्या जेमतेम तुकड्या भरतात. सोमवारी सकाळी अंगणवाडीच्या मुलांना त्यांचे पालक शाळेत घेऊन आले की शाळेच्या प्रवेश दारातच मद्यपींनी मद्याच्या बाटल्या फोडून परिसरात काचा टाकलेल्या दिसतात. या काचा जर शाळेतील बालगोपाळांच्या पायात शिरल्या तर त्यांना इजा होऊ शकते. यामुळे शाळेत मुलांना सोडविण्यासाठी आलेल्या पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेला रविवार व इतर सार्वजनिक सुटीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत मद्याच्या बाटल्या दिसून येतात. सोमवार (दि १४)रोजी असाच प्रकार उघडकीस आला आणि शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी प्रवेश द्वारावर मद्याच्या बाटल्या फोडलेल्या पाहून शाळेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून, शाळेत रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकच नसल्याने शाळेच्या मैदानात रात्री मद्याच्या पार्ट्या होतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळेस टवाळखोर गर्दी करून याच मैदानात मद्यप्राशन करून सिडको तसेच परिसरात धिंगाणा घालण्याचा प्रकारही या टवाळखोरांकडून केला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.शाळेच्या आवारात दोन ते तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये मनपा कर्मचारी राहत असल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी सदर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून फुकट लाईट वापरत आहे. तसेच शाळेच्या आवारात मुके जनावरही त्यांनी पाळल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. एकूणच संपूर्ण शाळाच रामभरोसे झाली असून, याबाबत मनपा आयुक्तांनीच लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.