सायखेडा : करंजी (ता. निफाड) येथे चोंढी-मेंढी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पगाराच्या वादातून संतोष अंबादास तांबेकर (२५) या मजुराचा मृत्यू झाल्याने सायखेडा पोलीस ठाण्यात भीमाजी अंबादास तांबेकर यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष तांबेकर हा पत्नी, मुलासह करंजी येथे राहतो. तीन महिन्यांपासून तो गावातील लखन झुरडे यांच्याकडे वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करीत होता. त्याच्या बरोबर काळू ऊर्फआनंदा रमण आव्हाड, रोहिदास सोपान झुरडे हेसुद्धा कामास होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संतोष गावातीलच रोहिदास झुरडे याच्या मोटारसायकलवर गावातून निघाले. त्यास आई शीलाबाई तांबेकर यांनी जाताना बघितले होते.रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास पोलीसपाटील लखन झुरडे यांनी भीमाजी तांबेकर यांना फोनवर संतोष यास मार लागला असून, त्यास नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. त्यानंतर भीमाजी तांबेकर हे कुटुंबासोबत रुग्णालयात पोहोचले. संतोष याच्या डोक्यास, दोन्ही कानाजवळ तसेच गुप्त भागाजवळ मार लागलेला होता. डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.पोलिसांनी पंचनामा केला. ज्ञानेश्वर वाळू तांबेकर यांनी दत्त मंदिराजवळ संतोष तांबेकर, रोहिदास झुरडे, काळू आव्हाड यांच्यात भांडण सुरू होते. संतोष यासदोघांनी काठीच्या दांड्याने मारले असल्याचे आपण समक्ष बघितल्याचे सांगितले.संशयित ताब्यातसायखेडा पोलीस ठाण्यात भीमाजी तांबेकर यांनी फिर्याद दिली असून, रोहिदास सोपान झुरडे, आनंदा ऊर्फकाळू रमण आव्हाड (दोघेही रा. करंजी) यांनी कामाचा पगार देतो असे सांगून, संतोष यास सोबत घेऊन गेले. पगार मागतो म्हणून, हातातील लाकडी दांड्याने संतोष यास मारहाण करून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
करंजी येथे मजुराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:55 AM
करंजी (ता. निफाड) येथे चोंढी-मेंढी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पगाराच्या वादातून संतोष अंबादास तांबेकर (२५) या मजुराचा मृत्यू झाल्याने सायखेडा पोलीस ठाण्यात भीमाजी अंबादास तांबेकर यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देफिर्याद दाखल : पगाराच्या वादातून घडला प्रकार