शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जायखेड्यात चाँदशहावली बाबांचा उरूस

By admin | Published: May 10, 2016 10:16 PM

जायखेड्यात चाँदशहावली बाबांचा उरूस

जायखेडा : ब्रिटिश काळापासूनची अखंड परंपरा असलेला व हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून सुप्रसिद्ध असलेला बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील चाँदशहावली बाबा उरूस उत्सव उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जायखेडा पोलीस ठाण्यातील चाँदशहावलीबाबाच्या दर्ग्यापासून ते जुन्या इंग्रजी शाळेतील चाँदशहावलीबाबाच्या पुरातन दर्ग्यापर्यंत सवाद्यसंदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जायखेडा व परिसरातील सर्व जातिधर्मांचे बांधव सहभागी झाले होते. संदल मिरवणुकीनंतर हिंदू मुस्लीम धर्मातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पुढारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी उरूस उत्सव कमेटी अध्यक्ष संजय बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र साळवे, उपसरपंच संजय मोरे, सटाणा पो.नी. बशीर शेख, स.पो.नी. नंदराज पाटील, राजेंद्र होळकर, माजी पं.स. सभापती सोमनाथ ब्राह्मणकार, गंगाधर गोसावी, माजी सरपंच शांताराम अहिरे, उरूस उत्सव समितीचे अध्यक्ष संजय बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र साळवे, सोसायटी सभापती चंद्रसिंग सूर्यवंशी, अनिल अहिरे, उपसरपंच संजय मोरे, पो. ह. बाळू माळी, राजेंद्र सावळे, दादामियाँ मन्सुरी, नारायण मोरे, शिफक काद्री, दत्तात्रेय अहिरे, निसरखाँ पठाण, नवलसिंग खैरनार, भास्कर अहिरे आदिंसह चाँदशहावली बाबा उरूस उत्सव समिती सदस्य व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दर्गा परिसरात यात्रा उत्सव झाला. उरूस उत्सवाच्या यशस्वीतेसाठी चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव कमेटी, गावातील विविध सामाजिक संस्था व विविध मंडळांचे कार्यकर्ते, जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)