शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
4
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
5
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
6
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
7
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
8
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
9
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
10
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
11
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
12
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
13
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
14
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
15
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ
16
रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ
17
महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित
18
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
19
१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या
20
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महाबोधीवृक्ष महोत्सव

By suyog.joshi | Published: October 24, 2023 9:54 AM

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

नाशिक : त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकाच्या परिसरात विजयादशमीदिनी आज होणाऱ्या महाबोधीवृक्ष फांदी रोपण महोत्सवासमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्य हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते दुपारी  या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण होणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवालासुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असून, महोत्सवासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्षनरहरी झिरवाळ, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपणमान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार असून, नाशिककरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या साेहळ्यासाठी राज्यभरातील भन्तेगण, धम्म उपासक, उपासिका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.  पालकमंत्री दादा भुसे आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सोमवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

देश-विदेशांतील भिख्यू, उपासकांची उपस्थिती या सोहळ्यासाठी संपूर्ण बुद्ध स्मारक परिसराची सजावट करण्यात आली आहे, तर बौद्धस्तुप आकर्षक रंगसंगतीने उजळून निघाला आहे. या महोत्सवासाठी श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि नेपाळ येथील प्रमुख भिख्यू आणि मान्यवरांचे नाशिक येथे आगमण झाले आहे.