लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : भगवान श्री शिव महादेवाचे अनेक अवतार एकादश रु द्र जगाच्या कल्याणासाठीच करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वाचक बालव्यास पंडित श्रीकांत शर्मा यांनी केले. येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथा सप्ताहात सहाव्या दिवशी हनुमान जन्मकथेविषयी त्यांनी संवाद साधला.दरम्यान, गुरुवार (दि.३) या सप्ताहाचा समारोप होणार आहे. शिवसेवा संस्थान कोलकाता यांच्यातर्फे श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील श्री चंदभवन येथे या कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सप्ताहादरम्यान २०१ पारायणार्थी शिवलिलामृत या ग्रंथाचे पारायण करीत आहेत. यावेळी शर्मा म्हणाले, भगवान विष्णू श्रीराम अवतार घेण्यापूर्वी श्री शिव भगवान विष्णूला म्हणाले होते, तुम्ही जेव्हा राम व्हाल तेव्हा मी माकडाच्या रु पाने जन्म घेऊन तुमची भक्तीभावाने सेवा करील व कायमच तुमची पाठ राखण करील आणि तोच माझा एकादश (अकरावा) रुद्रावतार होय ! अकरावा रुद्र म्हणजेच हनुमानजी होय. अत्यंत बलशाली असा हा अकरावा रुद्र होय ! भगवान महादेवाच्या अवताराला रुद्र म्हटले जाते. शिवाच्या एकादश रुद्रात विरभद,्र शंभु गिरीश, महायश, अजैकपात, अहिरबुध्न, पिनाकी, अपराजित, भुवनाधिश्वर, कपाली स्थानू असे अकरा रु द्रांची नावे असली तरी भगवान शिव कथेचे अनेक पुराणे आहेत. त्या प्रत्येक पुराणात अकरा रु द्रांची वेगवेगळी नावे आहेत. त्र्यंबकेश्वराचे देखील रु द्र म्हणून नाव असल्याचा उल्लेख कथेत आला.
महादेवाचे रु द्रावतार जगतकल्याणासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 11:38 PM