ठळक मुद्देठाणगाव: भोजापूर धरणात पाणीसाठ्यात वाढ
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हांळूगी नदीला गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळूंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे .निम्मा पावसाळा संपत आला तरी ठाणगाव परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. पण गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामूळे म्हाळूंगी नदीला महापूर आला आहे. म्हांळूगी नदीच्या उगम खो-यात चांगला पाऊस झाल्याने नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे .या नदीमूळे भोजापूर धरणात पाणी साठ्यात वाढीसाठी मदत होणार आहे म्हाळुंगी नदीला आलेल्या महापुरामूळे परिसरातील अनेक गावाना लाभ होणार आहे. म्हाळूंगी नदीला महापूर आला असून उंबरदरी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.