शरदचंद्र खैरनार / लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : महानिर्मितीने विक्रमी वीज निर्मितीचा मंगळवारी (दि.९)) एक टप्पा गाठला. तब्बल १०,४४५ मेगा वॅट वीज निर्मिती एका दिवसात झाली असून, महानिर्मितीच्या इतिहासात ६० वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करताना देशातील एक अग्रगण्य शासकीय वीजनिर्मिती कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या महानिर्मितीने उत्कृष्ट कामगिरी बजावत मंगळवारी (दि.९) दुपारी ४.४० वाजता एकूण १०,४४५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक विक्रमी शिखर सर केले आहे.गेल्या ८ मार्च रोजीही महानिर्मितीने १० हजार ९७ मेगावॅट निर्मिती साध्य केली होती. राज्यातील उद्योग , व्यवसाय यांची वाढती विजेची मागणी तसेच सुरू होत असलेल्या उन्हाळ्यामुळे एकूण राज्याची विजेची मागणी वाढत असून त्याची पूर्तता करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे महानिर्मितीने सिद्ध केले आहे. सर्व प्रकरांनी निर्मितीगेल्या ७ मार्च पासूनची आपली कामगिरी अधिकाधिक उंचावत मंगळवारी सर्वोत्तम कामगिरी करताना यापूर्वीचा २० मे २०१९ रोजीचा १० हजार ९८ मेगावॅटचा उच्चांक मोडत मंगळवारी दुपारी ४.४० वाजता ही कामगिरी नोंदवली. यामध्ये औष्णिक वीज निर्मितीद्वारे ७ हजार ९९१ मेगा वॅट , वायू वीज निर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगा वॅट, तर जल विद्युत केंद्राद्वारे २१३८ मेगा वॅट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्यात आली आहे .दहा हजार मेगा वॅट पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे.
महानिर्मितीने केला वीजनिर्मितीचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 1:28 AM
महानिर्मितीने विक्रमी वीज निर्मितीचा मंगळवारी (दि.९)) एक टप्पा गाठला. तब्बल १०,४४५ मेगा वॅट वीज निर्मिती एका दिवसात झाली असून, महानिर्मितीच्या इतिहासात ६० वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे.
ठळक मुद्देसाठ वर्षातील सरस कामगिरी