नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली. स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली जव्हाररोडवरील संन्यास आश्रम येथे ही बैठक घेण्यात आली. आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी या बैठकीत सांगितले की, पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे महंत मोहनदास हे १५ सप्टेंबर रोजी हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले असता वाटेत ते गायब झाले आहेत. या संदर्भात हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली. हरिद्वारच्या प्रमुख पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले, परंतु दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर राष्टÑीय प्रवक्तेमहंत मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते, त्या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. मेरठपर्यंत महंत मोहनदास यांचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. आखाडा परिषदेच्या महंताचे अशा प्रकारे अपहरण करण्याची घटना दुर्दैवी असून, या संदर्भात केंद्र व राज्य सरकारने तत्काळ चौकशी करून या अपहरणाचे षडयंत्र रचणाºयांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही आखाडा परिषदेने केली आहे. यावेळी बोलताना आखाडा परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंत मोहन दास यांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या बैठकीस त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू, महंत उपस्थित होते.हे महंत होते उपस्थितच्आखाडा परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, महामंत्री महंत हरिगिरीजी, प्रवक्ते डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे महंत राजेंद्र सिंह, अग्नी आखाड्याचे महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, जुना आखाड्याचे महंत सुशील गिरी, अटलचे महंत उदयगिरी, श्री पंचायती अखाडा बडा उदासीनचे महंत बालक दास, नया उदासी आखाड्याचे महंत विचार दास, आवाहनचे आनंद पुरी, निर्वाणी आखाड्याचे कमलेशगिरी दिगंबर आदी उपस्थित होते.
महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:28 AM