त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा शुक्रवारी सकाळी सहा वाजता आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संपदा लोहगावकर, उपनगराध्यक्ष सायली शिखरे, भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, हर्षल शिखरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी आपण संत निवृत्तीनाथांना जगातून कोरोना हद्दपार करा. जगात सुख शांती नांदो अशी आपण प्रार्थना केल्याचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सांगितले. याबरोबरच पूजा संपल्यानंतर ते म्हणाले केंद्र शासनाने २२ कोटींची प्रसाद योजना त्र्यंबक शहरासाठी मंजूर केली आहे. त्याबाबतचा निधी त्र्यंबकेश्वरसाठी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी केली.
निवृत्तीनाथ समाधी संस्थानतर्फे धर्मादाय आयुक्त तथा समाधी संस्थान प्रशासकीय समितीचे अध्यक्ष जयसिंग झपाटे, सहायक धर्मादाय आयुक्त राम अनंत लिपटे, मुख्याधिकारी संजय जाधव, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व ॲड. भाऊसाहेब गंभीर आदी उपस्थित होते. निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ मंदिराचे पुजारी तथा पदसिद्ध विश्वस्त जयंतराव गोसावी, योगेश गोसावी, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे आदींसह बहिरु पाटील मुळाणे, इंजि. अजित सकाळे, इंजि.विनायक माळेकर, अरुण मेढे आदी उपस्थित होते.
----------------------
रस्त्यावर बॅरिकेडिंग
निवृत्तीनाथ मंदिर परिसरात फक्त वारकरी, देवस्थान पदाधिकारी पुजारी जाऊ शकतील एवढाच रस्ता मोकळा आहे. बाकी रस्ता बॅरिकेडिंगने बंद करण्यात आला आहे. कोरोना कोविड निर्बंधांचे पालन काटेकोरपणे पालन केले जात होते. शहरात प्रसादी मालाचे व नेहमीच्या मालाची दुकाने सजलेली होती. निवृत्तीनाथांना प्रिय असणारे वारकरी भाविक निवृत्तीनाथांना भेटून गेले.