कामगार संघटनेकडून स्वागत
नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ६०० कोटींची मदत जाहीर केल्याने कामगार संघटनेने राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महामंडळाला राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दर आठवड्याला वृक्षारोपणाचा उपक्रम
नाशिक : युगांतर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून नगरसेविका सुषमा पगार यांच्या वतीने महापालिकेच्या मोकळ्या जागांवर दर आठवड्याला वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मातोश्रीनगर येथून या उपक्रमाला सुरूवात झाली.
योजनेपासून वंचित
नाशिक : लॉकडाऊनमुळे निराधार योजनेतील लाभार्थींसाठी दोन महिन्यांची आगाऊ रक्कम देण्याचे जाहीर करूनही जिल्ह्यातील अनेक लाभार्थी वंचित असल्याची तक्रार लाभार्थींकडून केली जात आहे. अनेकांना दररोज कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
कॅम्पस इंटरव्ह्यू
नाशिक : के. के. वाघ तंत्रनिकेतनमधील पंधरा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुणे येथे बजाज ऑटो कंपनीत नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीने कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडला.