किशोर इंदोरकर
मालेगाव कॅम्प - मालेगाव बाह्य मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. मालेगाव बाह्य मतदार १७ उमेदवार होते, यात प्रामुख्याने शिंदेसेना, उद्धवसेना व एक अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली. यात मतदारांनी कोणाला कौल दिला हे २३ तारखेला समजणार आहे.
बाह्य मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांचे गेल्या २० वर्षांपासून प्राबल्य आहे. यंदा त्यांना उद्धवसेना व एक अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले यात भुसे यांनी आपल्या शहर व तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखा मतदारांना सांगत मतदारसंघ पिंजून काढला तर शहरातील अनेक भागासह झोडगे, दाभाडी, रावळगावसारख्या मोठ्या गावांसह अनेक ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे. तर मविआचे अद्वय हिरे यांनी आपल्या पूर्वीचे मतदार सोबत आहे. यांसह वेगळे एक वेगळा व्हिजन समोर घेऊन सामोरे गेले आहे.
प्रभावी प्रचारयंत्रणा
अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांना मविआकडून उमेदवारी मिळेल या आशेवर दंड थोपटत रिंगणात उतरून मतदारसंघ पिंजून काढला. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली. त्यांनी राष्ट्रीय पक्षाप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवली.