नाशिक - पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याकारणाने महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते (दि.१८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटीत समोरासमोर भिडले. यामुळे रात्री पंचवटीतील चार हत्ती पुलाच्या भागात तणावाचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेत दोन मोटारीचे नुकसान झाले. पूर्व विधानसभा मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
पंचवटीतील चार हत्ती पुलालगत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ एका माजी नगरसेवकाच्या बंगल्यात उमेदवाराद्वारे पुरविणात आलेल्या रकमेतून पैसे वाटप केले आत असल्याचा संशय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी घेतला, यावेळी पुलावर उभ्या असलेली मोटार (एमएच१७ जेएम ७६००) आणि दुसरी मोटार (एमएच२० एएस २८२५० समाजकंटकांकडून फोडण्यात आली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मतदारसंघात मोठा फौजफाटा तैनात
पूर्व विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा राजकीय राडा झाल्यामुळे आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या या तोंडावर या मतदारसंघात दोन प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गुरुवारीही घडली होती घटना...
गणेश गीते यांचा भाऊ गोकुळ गीते यांच्या वाहनांवर दगड फेकण्यात आल्याने हिरावाडीत परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनाला चार दिवस होत नाही तोच पुन्हा सोमवारी रात्री कार्यकत्यांचे दोन गट समोरासमोर येऊन तुंबळ हाणामारीव दगडफेकीची घटना चढ़ल्याने पंचवटीतही संताप व्यक्त केला जात आहे.
चार हत्ती चौका परिसरात पैसे वाटप करण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यास आक्षेप घेतला. यावेळी पैसे वाटप करणाचा दोघांना वाचविण्यासाठी दोन मोटारीतून काही लोक याठिकाणी आले. त्यामुळे रहिवासी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. भाजपा कार्यकर्त्यांचा या घटनेशी संबंध नाही. - राहुल ढिकले, उमेदवार
पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी होत असत्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगविले. तसेच काही संशयितांची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी